संपादकीय: आमगाव विधानसभेत काँग्रेसचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर, एकजुट अशक्य!
भुपेंद्र मस्के
उपसंपादक, प्रहार टाईम्स न्युज नेटवर्क
आमगाव/देवरी:काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष समोर आला आहे, ज्यामुळे दोन गट निर्माण झाले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदारांचा पत्ता साफ करण्यात पक्षश्रेष्ठींना यश आले असले तरी कोरोटे समर्थक पक्षाचे काम करणे सोडाच ते पक्षाला मत ही देणार नाही अशा भावकितल्या चर्चा आहेत. तर नवखे उमेदवार राजकुमार पुराम यांना काँग्रेसचे कार्यकर्ते एकसंघ करण्यातच प्रचाराचा कालावधी निघुन जाईल. एकिकडे भाजप निष्ठावंत व एकसंघ कार्यकर्त्यांच्या बळावर असलेले भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संजय पुराम आपला गड सर करण्यात यशस्वी होतील असे राजकिय जाणकारांचे म्हणणे आहे.काँग्रेस मधील वाद हा पक्षाला भविष्यात धोक्याचा ठरू शकतो. काँग्रेसमधील पदाधिकारी व कार्यकर्ते हे संभ्रम अवस्थेत असल्यामुळे नेमकं आपण कोणाच्या मार्गदर्शनाखाली काम करायचं हाच मोठा प्रश्न असल्याचे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते हे खाजगीत सांगत आहेत.
निवडणूक म्हटलं की, एक एक मतासाठी उमेदवारांना आपल्या जिवाचं रान करावं लागत आहे. निवडून येण्यासाठी अपेक्षित मतांची जुळवाजुळव, आकडेमोड करून विजयाची गणिते मांडावी लागतात. मात्र, यात एक, दोघांपेक्षा अधिक उमेदवारांसह इतर कुणी उमेदवारांच्या विरोधात गेले तर त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तशीच काहीशी परिस्थिती आमगाव निवडणुकीच्या रिंगणात दिसून येत आहे. अनेक उमेदवार विविध पक्षांकडून निवडणुकीला सामोरे जात हे अपक्ष उमेदवार नेमकं कुणाच्या पथ्यावर पडतात, याविषयी उत्सुकता वाढली आहे.गडचिरोली- चिमुर चे नवनिर्वाचित खासदार नामदेवराव किरसान यांचा समर्थक गट हि एकमेव जमेची बाजू काँग्रेसच्या राजकुमार पुराम यांच्या बाजूने असली तरी अंतर्गत कलह व नियोजनशून्य कार्यकर्ते हे आपल्याच पायावर धोंडा मारून घेतील यात मात्र शंकाच नाही.