“साहेब खुर्चीतच… तुमच्यासाठी सतरंजी”

वार्तापत्र:

भुपेंद्र मस्के
उपसंपादक, प्रहार टाईम्स न्युज नेटवर्क

विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे .आमगाव विधानसभेत महायुतीची जागा पहिल्याच यादीत जाहिर करून भाजपने चौकार हानला. व महाविकास आघाडी यांच्याकडून उमेदवार निश्चिती करण्यासाठी अखेरपर्यंत झालेली राजकीय गोटात चलबिचलीत विद्यमान आमदारांचा बळी गेला.
एकमेकांसमोर प्रतिस्पर्धी बनुन उमेदवारी मागण्याच्या काट्याच्या लढाईत अकरा मधुन एका साहेबाला शेवटी उमेदवारी जाहिर झाली.

आमगाव विधानसभा
मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी मधील उमेदवारांची भाऊ गर्दी झाल्यामुळे कोणाला तिकीट द्यावे, असा प्रश्न पक्षश्रेष्ठींना पडला होता. आता पक्षांतर्गत बंडखोरी रोखणे हा यक्षप्रश्न पडणार हे निश्चित !

अशा परिस्थितीचे आकलन करायचे झाल्यास महाविकास आघाडीचे उमेदवार हे गतकाळात प्रशासनाच्या खुर्चीवरच बसले होते. वर्ष दोनवर्षे सांस्कृतिक व सामाजिक खुर्चीवर बसुन आता ते मात्र उमेदवारीची खुर्ची मिळवली हा त्यांचा इतिहास व वर्तमान. तर महायुतीने प्रवाहाच्या दिशेने वाटचाल कशी असावी याचा उत्तम अभ्यास असणा-या उमेदवाराला उमेदवारी जाहीर केली.

महायुती व महाविकास आघाडीमध्ये च खरी लढत असली तरी काही अपक्ष उमेदवारही गुडघ्याला बाशिंग बांधून आपल्या लग्नात वराती किती नाचतात यावर नजर ठेऊन आहेत. मतांच्या आकडेमोडीत अपक्षांनी कोणी कोणाचे मत कापले यावरच बाजार गरम असणार आहे. सामान्य निष्ठावंत राजकिय कार्यकर्त्यांच्या नशिबात सतरंजीच उरली तर साहेब खुर्चीतच राहणार हे निश्चित…

Share