नो रिपीटर्सच्या फार्मुलावर होऊ शकतो खेळ, आमगाव विधानसभेत कांग्रेस चा नवीन चेहरा उतरण्याची शक्यता!

देवरी: आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रातील राजकीय हालचालींना वेग आले असून भाजपने आपला दमदार उमेदवार पहिल्या यादीतच मैदानात उतरवला आहे. परंतु महाविकास आघाडी मधील बिघाडी मुळे प्रतिस्पर्धी उमेदवार अजूनही गुलदस्त्यात आहे. सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. सर्वच पक्षांकडून आपआपल्या परीने तयारी करून जोर लावण्याचे काम केले जात आहे . त्यातच उमेदवारांना घेवून महायुती व महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये रस्सीखेच दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी भाजपने आपल्या उमेदवारांची यादी जाहिर केली. यामधे संजय पुराम यांना भाजपचे कमळ कन्फर्म होताच महाविकास आघाडी कोणत्या चेहऱ्यावर डाव खेळून रिंगणात उतरणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

आमगाव देवरी विधानसभेत नो मोअर रिपीटर्स असा फार्मुला आहे, येथील जनतेनी जुन्याला डावलून नवीन चेहऱ्याला हीरो बनविल्याचे राजकीय इतिहास आहे याच फार्मुलाचा वापर करून करेक्ट कार्यक्रमकरण्याचा डाव यावेळेस मविआ करणार असल्याची शक्यता आहे.

आमगाव-देवरी या ठिकाणी असलेला काँग्रेसचा चा वातावरण तापला असून महायुतीच्या उमेदवाराला फाईट देण्यासाठी राजकीय विश्लेषक आणि अनुभवी आपले तर्क लावत असून भाजपच्या संजय पुराम यांच्या विरुद्ध काँग्रेस चा नवीन चेहऱ्यावर डाव लागणार असल्याचे अंदाज आहे. नवीन चेहरा असा तुल्यबळ उमेदवार देणार का? अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे महविकास आघाडीच्या उमेदवार कोण असणार, याची उत्सुकता लागली आहे.

Share