नमुना मतपत्रिका छपाईवर बंदी, होर्डिंग, बॅनर लावण्यावर प्रतिबंध

गोंदियाः विधानसभा निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत राजकीय पक्ष, उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी व हितचिंतकांना नमूना मतपत्रिका छपाईस जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे. यात इतर उमेदवारसचे नाव व त्यांना नेमून देण्यात आलेले चिन्ह वापरणे, आचारसाह मतपत्रिकेसाठी आयोगाने निश्चीत केलेल्या कागदाचच्या आकारात नमुना मतपत्रिका छपाई करणे इत्यादीवर निर्बंध घालण्यात आले आहे. हे आदेश निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अंमलात राहतील. या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तीवर भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम २२३ अन्वये कारवाई केली जाईल.

ताफ्यात दहापेक्षा अधिक वाहने वापरास निर्बंध

राजकीय पक्षाचे उमेदवार, निवडणूक लढविणारे उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी दहा पेक्षा अधिक मोटार गाड्या, वाहनांच्या ताफ्याचा वापर करण्यास निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत. हे आदेश निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अंमलात राहतील. या आदेशाचाउ भंग करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई केली जाणार आहे.

तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापण्यास निर्बंध

निवडणूक काळात जिल्ह्यातील धार्मिकस्थळे, रुग्णालये, शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणांच्या आवारात तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यावर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्बंध घालण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यत अंमलात राहतील.

होर्डिंग, बॅनर लावण्यावर प्रतिबंध

निवडणुकीचे होर्डिंग्ज, बॅनर कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर रहदारीस अडथळा होईल किंवा अपघात होईल अशा पध्दतीने लावल्यास कारवाई केली जाणार आहे. राजकीय पक्षांनी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी व हितचिंतकांना यासंदर्भात सुचित करण्यात आले आहे.

Share