आतापर्यंत 40 गुंडांना केले तडीपार, 80 जणांचे प्रस्ताव केले सादर
गोंदिया : यंदा लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीमुळे तब्बल ८० गुंडांचे तडीपारचे प्रस्ताव जिल्हा पोलिसांनी सादर केले. यातील ४० गुंडांना तडीपार करण्यात आले आहे. त्यामुळे गुन्हेगारीवर आळा बसला आहे. जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिसांचे एक पाऊल पुढे आहे.
गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिसांकडून सराईत गुन्हेगारांना तडीपार आणि अट्टल गुन्हेगारांवर एमपीडीएसारख्या कारवाया केल्या जात असल्याने जिल्ह्यातील गुन्हेगारी नियंत्रणात आहे. गुन्ह्यांचा तपास करण्याची गती झपाट्याने वाढविल्याने उघडकीस आलेल्या गुन्ह्यांची टक्केवारी ७० ते ८० च्या घरात आहे. जिल्ह्यातील आणखी गुन्हेगारांवर तडीपारची कारवाई सुरूच आहे. पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश लबडे यांनी जिल्ह्यातील गुंडांची कुंडली तयार करून त्यांना योग्य ठिकाणी पोहोचविण्याचे काम केले आहे.