आमगाव विधानसभा मतदारसंघात १५ नामनिर्देशन पत्र वितरित
देवरी: आमगाव विधानसभा मतदारसंघात (अ.ज) साठी आज 22 ऑक्टोबर रोजी एकूण 15 नामनिर्देशन पत्र वितरीत झाले असून यांपैकी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे -02, राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष, (शरद पवार) – 01, भारतीय जनता पार्टी -08 तर 04 अपक्ष उमेदवारांना वितरीत करण्यात आले. आज दिवसअखेर एकही नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आलेले नाही. सदर माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कविता गायकवाड , ६६ – आमगांव विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी, देवरी यांनी माध्यमांना दिली.