दमा औषधीचे निशुल्क वितरण देवरी येथे 16 रोजी

देवरी – कोजागिरी पौर्णिमेनिमित्त, सुवर्णप्राशण फाउंडेशन आणि दिनबंधू ग्रामीण विकास संस्था देवरी यांच्या संयुक्त विद्यमाने देवरी येथील आफताब मंगल कार्यालय येथे 16 ऑक्टोबर 2024 रोज बुधवार ला सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत निशुल्क दमा या आजारावरील औषधीचे वितरण करण्यात येणार आहे. दमा ,जुनाट सर्दी ,खोकला, एलर्जी इत्यादी आजार बरे होण्यासाठी मोफत औषध वितरण आणि आयुर्वेदिक उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आव्हान डॉ. सुनील समरीत, कुलदीप लांजेवार आणि मित्रपरिवार समूहाने केली आहे.

Share