नवरात्री उत्सवात पावसाचे विरजण , उकाड्यानंतर पावसाची हजेरी

देवरी ◾️ नवरात्री उत्सव थाटात साजरा होत असतांना ऑक्टोबर महिन्यात पावसाने हजेरी लावली असून नवरात्री उत्सव साजरा करण्याच्या सार्वजनिक मंडळांच्या व्यवस्थेवर परिणाम पडला आहे. यामुळे गरबा, नृत्य, यात्रा करण्याऱ्या भाविक भक्तांना निराशा हाती लागली आहे. विशेष म्हणजे देवरी शहरात स्थानिक धुकेश्वरी माता मंदिर भाविक भक्तांनी गजबजलेले असते. हजारोच्या संख्येने लोक नवरात्री मधे दर्शनाला येत असतात परंतु पावसामुळे भाविक भक्तांच्या संख्येवर परिणाम होण्याची शक्यता नाकारत येत नाही.

यंदा देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज खरा ठरला. आता ऑक्टोंबर महिन्यातही सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे. ऑक्टोंबर महिन्यात सरासरीपेक्षा ११५ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. दीर्घकालीन सरासरीनुसार ऑक्टोंबर महिन्यात ७५.४ मिमी पाऊस पडतो. डिसेंबर महिन्यापर्यंत पावसाचे संकेत भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉक्टर मृत्यूजंय महापात्रा यांनी दिले.

ऑक्टोंबर ते डिसेंबर दरम्यान ईशान्य मान्सून

हवामान विभागाने मे महिन्यात नैर्ऋत्य मान्सून १०६ टक्के पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार यंदा पाऊस चांगला झाला. आता ऑक्टोंबर ते डिसेंबर दरम्यान ईशान्य मान्सूनदेखील चांगला होणार आहे. या काळात दक्षिण भारतात सर्वाधिक पाऊस पडणार आहे. तसेच महाराष्ट्रातही सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे.

Share