देवरी येथे महामार्गावर भर चौकात भिषण अपघात, स्विफ्ट वाहन चकनाचूर
देवरी १०: नवरात्री उत्सव सुरू असतांना देवरी शहरात मोठे अपघात घडले. देवरी शहराच्या मधोमध राष्ट्रीय महामार्ग क्र ६ वरअग्रसन चौकात रात्रीच्या सुमारास ट्रकनी स्विफ्ट कार ला जोरदार धडक दिली असून या अपघातात स्विफ्ट वाहनाचा चकनाचूर झाला असून वाहन चालक गंभीर असल्याचे वृत्त आहे. देवरी येथे महामार्गावर दुतर्फा मोठे ट्रक आणि इतर वाहनांच्या रांगा लागून असल्यामुळे अपघातात वाढ होत असल्याचे बघावयास मिळत आहे. ट्रक चालक आपले वाहन उभे करून देवरी येथील बाजारात तसेच चहापाणी आणि जेवणासाठी जातात त्यामुळे रस्त्यावर वाहनांची गर्दी होत असल्याचे चित्र बघावयास मिळते आणि अपघातांना आमंत्रण दिले जाते. पुढील तपास देवरी पोलीस करीत आहेत.