देवरी येथे अग्रसेन महाराज जयंती उत्सव थाटात संपन्न

शहर काँ. कमिटीच्या वतीने शीतपेय तसेच फळांचे वाटप

देवरी ◾️अग्रेसन जयंती हा पौराणिक राजा अग्रसेन यांचा जयंती उत्सव आहे. तो अग्रोहा चा राजा त्याच्यापासूनच अग्रवाल जातीची उत्पत्ती झाली. अग्रेसन जयंती हिंदू कॅलेंडर मधील अश्विन महिन्याच्या चौथ्या दिवशी साजरी केली जाते. यातच देवरी शहरातील आमगाव रोडवरील अग्रेसन भवन मध्ये अग्रेसन महाराज जयंती उत्सव मोठ्या थाटामाटाने करण्यात आले. त्यानिमित्ताने देवरी शहरात पदयात्रा काढण्यात आली. या जयंती निमित्त पदयात्रेमध्ये, शहर काँग्रेस कमिटी द्वारा शीतपेय तसेच फळांचे वाटप करण्यात आले. यावेळी शहर काँग्रेस अध्यक्ष कुलदीप गुप्ता, सरबजित सिंग भाटिया नगरसेवक, मोहन डोंगरे नगरसेवक, नितीन मेश्राम नगरसेवक, शकील कुरेशी नगरसेवक, उत्तम साखरे जिल्हा अनुसूचित जाती महासचिव, अमित तरजूले, प्रशांत कोटांगले अंतरीक्ष बहेकार, राकेश बहेकार, राजेश गहाणे, संजू बलगे, सुरेंद्र बनसोड, कमलेश पालीवाल, संदीप मोहबिया, मुस्कान खान, मतीन पठाण, सावंत राऊत, दीपक राऊत, रमेश कनोजिया तसेच अन्य हजर होते.

Share