लोहारा येथील अवैध दारु विक्री करणा-या इसमास केले हद्दपार
देवरी ◾️ लोहारा येथील अवैध दारु विक्री करणा-या इसमास केले हद्दपार केले आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे, नित्यानंद झा अपर पोलीस अधीक्षक गोंदिया कॅम्प देवरी, विवेक पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी यांचे मार्गदर्शनात व सुचणेप्रमाणे प्रविण डांगे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन देवरी यांनी पो.स्टे. हद्दद्दीतील इसम नामे सोहनलाल हिरालाल बारापात्रे वय. ५८ वर्षे रा. सुरतोली/लोहारा ता.देवरी जि. गोदिया हा पोलीस स्टेशन हददीमध्ये अवैध दारु बाळगुन दारु विक्री करणे अशा प्रकारचे गुन्हे करीत आहे. त्याचेवर वारंवार प्रतिबंधक कारवाई करण्यात आली असतांनासुध्दा त्याचे वर्तणात कोणताच बदल होत नाही व कायदयाच्या धाक त्याचे मनात उरलेला दिसुन येत नाही. त्यांचे या अवैध धंदयामुळे देवरी शहरातील तरुणवर्ग या बाबीस बळी पडत आहेत. अशाप्रकारचे बेकायदेशिर कृत्ये रोखण्यासाठी त्याचेवर प्रतिबंधक कारवाई करने कामी मा. उपविभागीय दंडाधिकारी सा. देवरी यांचेकडे महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६ (ब,ब) प्रमाणे प्रस्ताव तयार करुन पाठविले असता सदर प्रकरणाची कविता गायकवाड उपविभागिय दंडाधिकारी देवरी यांनी चौकशी व सुनावणी करुन नमुद इसमाला देवरी, आमगाव, सालेकसा या तालुक्याच्या बाहेर ०२ महिन्याकरीता द्ददपार केले आहे.