गोंदियातील २२ गावानं मध्ये डेंग्यूचा धोका

गोंदिया◾️ जिल्ह्यात अनेक गावांमध्ये विविध आजारांनी रुग्णालयांमध्ये गर्दी पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात १११६ गावे, पाडे आहेत. या पैकी २२ गावांतील लोकांनी किटकजन्य आजार हिवताप व डेग्यूचा धोका वाढविला आहे. या गावांमधील घरे, पाणीसाठे, कुंड्यांमध्ये किटकजन्य आजार हिवताप, चिकुनगुनिया, डेंग्यूच्या डासांच्या अळ्या आढळल्या आहेत. किटकसर्वेक्षणातून ही धक्कादायक बाब पुढे आली आहे. जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात हिवताप, डेंग्यू, चिकुनगुनियाबाधित रुग्ण आढळल्यानंतर हिवताप व जिल्हा आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

जिल्ह्यातील आरोग्य कर्मचार्‍यांद्वारे संबंधित परिसरात किटकशास्त्रीय सर्वेक्षणासह पाणीसाठ्यांची तपासणी केली जात आहे. यावेळी डास अळी प्रतिबंधक टेमिफॉस औषध टाकले जात आहे. दुषित पाणीसाठे नष्ट केले आहेत. जिल्ह्यात हिवताप, डेंग्यू रुग्ण वाढत असले तरी आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आहे.  जानेवारी ते जुलैपर्यंत ३ हजार ३८८ ठिकाणी गप्पी मासे सोडण्यात आली. सोबतच किटकनाशक फवारणी करण्यात आल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद चव्हाण यांनी दिली. पावसाळा सुरु आहे. हे वातावरण हिवताप, डेंग्यूंच्या डासांची उत्पतीस पोषक असते. म्हणून घर व परिसर स्वच्छ ठेवावा, पाणी साचू देऊ नये, तापासह इतर लक्षणे दिसल्यास तत्वरीत जवळील आरोग्य संस्थेत उपचार घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे यांनी केले आहे. जिल्हा आरोग्य विभागाने १ लाख ४६ हजार ७६६ घरांचे सर्वेक्षण केले. यात ३ लाख ७६ हजार १६७ पाण्याचे साठे तपासले. पैकी ४ हजार १९५ पाणीसाठे दूषित आढळले. २ २ गावांतील ३ हजार ५८ घरांत डास अळ्या आढळल्या.

Share