लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये मनोहर भाई पटेल कनिष्ठ महाविद्यालय देवरी अजिंक्य

देवरी ◾️क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा अधिकारी कार्यालय गोंदिया ,यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एकोणवीस वर्ष वयोगटातील मुलांच्या व मुलींच्या जिल्हास्तरीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा खमारी या ठिकाणी संपन्न झाल्यात .या स्पर्धेत मनोहर भाई पटेल कनिष्ठ महाविद्यालय देवरीच्या मुलांच्या व मुलींच्या चमुने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकाविला आहे .त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे ,व ते विभागीय स्पर्धेत गोंदिया जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. जिल्हास्तरीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेच्या विजय चमूमध्ये भावेश राजकुमार राऊत ,नैतिक महेश सिंग बघेल ,प्रणय मधु कुरसुंगे, नैतिक संजय बांगरे, द्वीप जगदीश खेडकर ,गगन अनिल कुमार शरणागत ,क्रिस मधुलाल चव्हाण ,तौशिफ नईम खान, मयंक अरुण वालदे, निशांत किशोर उईके ,सलील संजय मडामे, आदित्य नामदेव लाडे ,भव्य हरीश कुमार दोनोडे अंकुश महादेव भोयर, चैतन्य राधेलाल पवार ,यांचा समावेश होता .तर मुलींच्या लेदर बॉल क्रिकेट संघात रीता धर्मेंद्र लटये, प्रांजल मनोज कुमार टेंभुर्णीकर ,आकांक्षा हेमराज कुरसुंगे,आयरा ओम प्रकाश आगासे,जयश्री रत्नकुमार राऊत ,गुंजन शंकर राऊत ,सलोनी इंद्रपाल डोंगरे ,नेहा लखन परतेती, डॉली घनश्याम सयाम,सकीना रुखानलाल सर्पा ,अंजली भागोराम मडावी ,लिपिका युवराज देशमुख ,धनेश्वरी दाणेराम शाहू निकिता वासिम लेंढारे इत्यादी खेळाडूंचा समावेश होता जिल्हास्तरावर झालेल्या स्पर्धेत सदर चमुच्या खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन करीत अव्वल क्रमांक पटकाविला .व त्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली असून या विजयी चमचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. लेदर बॉल क्रिकेट संघाच्या उत्कृष्ट प्रदर्शनाबद्दल संस्था सचिव श्री रामकुमारजी गजभिये ,प्राचार्य जी.एम. मेश्राम ,उपमुख्याध्यापक एस.टी .हलमारे ,पर्यव्यक्षक डी.एच.ढवळे, समस्त प्राध्यापक वृंद,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,या सर्वांनी विजयी संघाचे अभिनंदन केले .व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या .विजयी संघाला प्राध्यापक टी .आर .देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले .सदर चमु विभागीय स्पर्धेत गोंदिया जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.

Share