देवरी चिचगड पुलावरील पर्यायी मार्ग बंद केल्याने प्रवाशी त्रस्त
देवरी: देवरी चिचगड मार्गावरील काही दिवसापूर्वी खचलेल्या सालई येथील पुलावर अद्याप पर्यायी मार्ग तयार करण्यात आला. परंतू तोही मार्ग बंद केल्याने या मार्गाने ये – जा करणारे प्रवाशी संतप्त झाले असून त्यांनी पुलाच्या ठिकाणीच आंदोलन केले.
१७ सप्टेंबरच्या पहाटेला देवरी तालुक्यातील सालई जवळील ४० वर्ष जुना पूल खचल्याची घटना घडली होती. घटना घडतात प्रशासन खडबळून जागे झाले. जीर्ण झालेल्या पुलाचे अजून पर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाने योग्य देखरेख न केल्याचा ठपका बसला. जनप्रतिनिधींचा रोष पाहता सार्वजनिक बांधकाम विभाग या पुलावरील पर्यायी मार्ग बनवण्याच्या कामाला लागले. त्या पर्यायी मार्गावरुन (दि.२०) शुक्रवारला मोटर
तारांबळ उडाल्याने त्याच ठिकाणी नागरिकांनी आंदोलन करून आपला रोष व्यक्त केला.सायकलने नागरिक ये जा करीत असताना सायंकाळी पाचच्या दरम्यान कंत्राटदाराने या पर्यायी मार्गावर रोडरोलर आडवा करीत रस्ता बंद केल्याने मोटार सायकलने गावाकडे ये-जा करणार्याची चांगलीच तारांबळ उडाली. यावेळी शंभर ते दीडशे मोटरसायकलची पर्यायी मार्गाच्या ठिकाणी रांगा लागल्या होत्या. त्यामुळेचिचगड कडे जाणाऱ्या नागरिकांची चांगलीउपस्थित नागरिकांनी स्थानीक जनप्रतिनीधीनां फोन केले असता बाहेर असल्याचे सांगितले गेले. हा पर्यायी मार्ग तयार करीत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे बॅरीकेट न लावता पर्यायी मार्गाच्या मध्यस्थानी रोलर आडवा करण्यात आल्याने गावाकडे जायचे कसे? हा प्रश्न नागरिकांना पडला. सकाळी सुरू असलेला पर्यायी मार्ग सायंकाळी ठेकेदाराच्या आळमुठी धोरणामुळे व रोड रोलर आडवा केल्याने संतप्त नागरिकांनी शासन व प्रशासनाविरुद्ध चांगला रोष व्यक्त केला असून हा मार्ग नागरिक व शाळकरी विद्यार्थ्यांसाठी केव्हा सुरू होईल हा प्रश्न उपस्थित केला आहे.