पुजारीटोला धरणाच्या पाणी पातळीत वाढ ; आठ दरवाजे उघडले

गोंदिया : जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला धरणातील पाणी पातळीत वाढ झालेली आहे. आज दि. २२सप्टेंबर रोज रविवार ला सायंकाळी आठ वाजता पुजारीटोला धरणाच्यां पाणी पातळीत वाढ झाली  आहे  त्यामुळे धरण  नियंत्रणाकरीता जलाशय परिचलन आराखडा प्रमाणे धरणाचे गेट सुरू करुन ०८ वक्रदवार .३० मी. ने उघडण्यात आले आहे. यामधून ६४७५ क्युसेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे.
नदी काठावरील गावांना तसेच नदीपात्रातून आवागमन करणाऱ्या सर्व संबंधीतानी स्वतः ची काळजी बाळगावी असा सतर्कतेचा ईशारा देण्यात येत आहे.सोडण्यात आलेला विसर्ग सामान्य आहे.
जलाशयात येणारा येवा पाहून जलाशय परिचलन आराखडा प्रमाणे विसर्ग कमी जास्त करण्यात येऊ शकतो त्यामुळे नदीपात्राजवळ जाणे टाळावे. कोणत्याही नागरिकास काही अडचण आढळून आल्यास जिल्ह्याच्या खालील दिलेल्या मदतकेंद्र क्रमांकावर संपर्क करावा.०७१८२२३०१९६,९४०४९९१५९९

Share