‘ते’पाचही ट्रक छतीसगडला रवाना शासकीय पोत्यांमध्ये भरले धान; शहानिशाअंती सुटका

देवरी: देवरी पोलिसांनी जिल्ह्यातून छत्तीसगड राज्यात धान घेऊन जाणारे पाच संशयित ट्रक देवरी तालुक्यातील शिरपूरबांध येथील सीमा तपासणी नाक्यावरून शनिवारी (दि. १४) ताब्यात घेतले होते. धान शासकीय पोत्यांत भरून होते. त्यामुळे पोलिसांना संशय आला होता. मात्र पणन महासंघ आणि आदिवासी विकास महामंडळाने केलेल्या तपासणीत ते पोते जुने असल्याचा

अहवाल दिल्याने गुरुवारी (दि. १९) चारही ट्रक सोडण्यात आले. देवरी येथील उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक पाटील हे गस्तीवर असताना त्यांना देवरी तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील शिरपूरबांध येथील आरटीओ चेक पोस्टजवळ धान घेऊन जाणारे ५ ट्रक हे एकामागे एक जात असताना त्यांच्यावर संशय आल्याने ट्रक थांबवून तपासणी केली असता

त्यात धान आढळून आले. यासंदर्भात पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली असता ट्रकमधून नेण्यात येत असलेल्या धानाच्या पोत्यावरः महाराष्ट्र शासनाचा मार्क असल्याने हे धान शासकीय धान तर नाही ना याची चौकशी सुरू केली. दोन ट्रक हे नवेगावबांध येथून आले आहेत, तर एक ट्रक सौंदड येथून आला होता. तसेच दोन ट्रक हे आमगाव येथून छत्तीसगड राज्यात नेत असल्याची माहिती वाहन चालकांनी पोलिसांना दिली होती. जिल्ह्यात सध्याच्या घडीला रब्बी हंगामात आदिवासी विकास महामंडळ, तसेच जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने खरेदी केलेला धान भरडाईकरिता राइस मिल मालकांना देण्यात येतो.

Share