गणपती गेले गावाला, आनंदाचा शिधा मिळेना आम्हाला

शिधा वाटप न झाल्याने रेशनधारक नाराज

गोंदिया : राज्य सरकारने गौरी गणपतीमाठी आनंदाचा शिधावाटप करण्याचे ठरविले होते. मात्र, गणेशोत्सव संपून चार ते पाच दिवस उलटून गेले हरी शहरात अद्याप आनंदाचा शिधा वाटप न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्यातच काही दिवसात शिधावाटप होणार, अशी माहिती अन्नधान्य वितरण कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

राज्य सरकारने गौरी गणपतीच्या सणासाठी १७ ऑगस्टपासून १७ सप्टेंबरपर्यंत देण्याचा निर्णय घेतला होता. याचा लाभ रेशन धारकांना मिळणार होता. गणपती विसर्जन होऊन चार दिवस उलटून गेल्यानंतरही आनंदाचा शिधावाटप न झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. उल्लेखनीय असे की, शिधातील चार वस्तूपैकी काही दुकानात केवळ एक दोन वस्तू आल्याने दुकानदारांना चार वस्तूंचा संच असलेली पिशवी देता येत नाही, त्यामुळे दुकानदार सर्व वस्तू येण्याची वाट पाहत आल्याची माहिती रेशन दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगराज रहांगडाले, जिल्हा सचिव बबलु वासनिक, खेमराज साखरे यांनी दिली आहे.

आनंदाचा शिधा वाटप होत नसल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. त्यामुळे नागरिक व दुकानदारांमध्ये वाद होत आहेत. तर काही दुकानदारांना सप्टेंबरचा तांदूळ मिळालेला नाहीं, तरऑक्टोबरचा तांदूळ दुकानांमध्ये येण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच राज्य सरकारने जानंदाचा मिधा गौरी गणपतीच्या सणासाठी १७ ऑगस्टपासून १७ सप्टेंबरपर्यंत देण्याचा निर्णय घेतला होता. शिधातील चार वस्तूंपैकी काही दुकानात केवळ दोन ते तीन वस्तूच आल्या असल्याने दुकानदारांना चार वस्तूंचा संच असलेली पिशवी ग्राहकांना देता येत नाही. त्यामुळे दुकानदार सर्व वस्तू येण्याची वाट पाहत असल्याची माहिती रेशन दुकानदार संघटनेचे सचिव बबलु वासनिक यांनी दिली

Share