न्या.वडणे समितीचा सकारात्मक अहवाल सात दिवसात द्याजिल्हाधिकारी कार्यालयावर गोंड गोवारी समाजाचा आक्रोश मोर्चा

गोंदिया : सेवानिवृत्त न्या.वडणे यांच्या अध्यक्षतेखाली गोंड गोवारी समाजाचा अभ्यास करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीचा अहवाल सात दिवसात द्या, सन १९५० च्या गोवारी महसूलीसमोर गोंड लावून चुकीचे गोंड गोवारी पुरावा तयाार करणार्‍यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे व गोंड गोंवारी अनुसूचित जमातीचे सर्व लाभ विना विलंब देण्यात यावे, या प्रमुख मागणीला घेवून आदिवासी संविधानिक गोंड गोवारी संघर्ष कृती समितीच्या नेतृत्वात २० सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्च्याच्या माध्यमातून शासन व सरकारच्या चालढकल धोरणांचा निषेध नोंदविण्यात आला.
मागील ७० वर्षांपासून गोंड गोवारी समाजाच्या वतीने आपले हक्क आणि न्यायासाठी संवैधानिक मार्गाने लढा दिला जात आहे. परंतु, राज्यकर्ते सतत समाजाची दिशाभूल करून न्यायापासून वंचित ठेवत आहेत. राज्य सरकारने सेवानिवृत्त न्यायाधिश के.एल.वडणे यांच्या अध्यक्षतेत समिती गठीत करून सुप्रिम कोर्टाच्या निर्णयानुसार समितीला गोंड-गोवारी समाजाची सत्य माहिती सादर करण्यासाठी सहा महिन्याची वेळ दिली होती. ही वेळ पूर्ण होवून अद्यापही सकारात्मक अहवाल सादर करण्यास समितीकडून दिरंगाई केली जात आहे. तर सरकारही उदासीनता दाखवून समितीला मुदतवाढ दिली. हा प्रकार दिशाभूल करण्यासारखा असून या कृतीमुळे गोंडगोवारी समाजामध्ये आक्रोश निर्माण झाला आहे. त्यामुळे गोंड गोवारी समाजाचा अभ्यास करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीचा अहवाल सात दिवसात द्या, सन १९५० च्या गोवारी महसूलीसमोर गोंड लावून चुकीचे गोंड गोवारी पुरावा तयाार करणार्‍यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे, २४ एप्रिल १९८५ च्या शासन निर्णयातील गोंडगोवारी जमाती संबधित माहिती दुरूस्त करावी व अनुसूचित जमातीचे लाभ गोंड गोवारी समाजाला देण्यात यावे, या प्रमुख मागणीला घेवून आदिवासी संविधानिक गोंड गोवारी संघर्ष कृती समितीच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. मोर्च्याला स्थानिक इंदिरा गांधी क्रीडा संकूल येथून सुरूवात झाली. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी मार्र्फत राज्य शासनाला सादर करण्यात आले. या मोर्च्यात गोंदिया, गोरेगााव, सडक अर्जुनी, आमगाव, अर्जुनी मोरगाव, सालेकसा, देवरी, तिरोडा तालुक्यातील गोंड गोवारी समाज बांधव मोठ्या संख्येत सहभागी झाले होते.
…………………
यांनी केले आंदोलनाचे नेतृत्व
जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या आक्रोश मोर्च्याचे नेतृत्व आदिवासी संविधानिक गोंड गोवारी संघर्ष कृती समितीचे जिल्हा संयोजक तथा जिल्हाध्यक्ष सुशिल राऊत यांनी केले. यावेळी प्रामुख्याने डॉ.शारदा राऊत, के.के.नेवारे, आमगाव येथील भुवनेश ठाकरे, तिरोडाचे टेकचंद चौधरी, श्रीचंद चौधरी ,रेखलाल राऊत , चेतन वघारे,शिवलाल नेवारे,गुलाब नेवारे ,शेखर सहारे, विजय नेवारे दिनेश कवरे, प्रमोद शहारे, विजय भोयर, प्रविण शहारे, महेश शेंदरे, रविंद्र भंडारी, विजय शेंदरे, महेश शहारे, , दिनेश राऊत, ओम राऊत, घनश्यात राऊत, यांनी केले.
…………
चुकीचे गोंड गोवारी पुरावा तयाार करणार्‍यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा
आदिवासी गोंडगोवारी समाजाच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला. संपुर्ण महाराष्ट्र १९५० पूर्वीचे गोंड, गोवारी जातीचे महसुली पुरावे नसतांना राज्य शासनाचे अधिकारी, कर्मचारी आणि संबंधित व्यक्तींनी १९५० च्या गोवारी महसुली समोर गोंड लावून चुकीचे १९५० चा गोंड गोवारी पुरावा तयार केला. त्यामुळे अशा अधिकारी, कर्मचार्‍यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून गोंड गोवारी समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी मोर्चेकरूंनी केली आहे.
००००००

Share