देवरी: आमगाव विधानसभा क्षेत्र अंतर्गत देवरी तालुक्यातील ग्राम वडेगाव येथे दि.19 सप्टेंबर 2024 ला अनिल बिसेन उपसभापती पंचायत समिती देवरी यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी भव्य महिला मेळाव्याचे आयोजन भारतीय जनता पार्टी तर्फे करण्यात आला . सदर महिला मेळाव्याला परिणीता फुके यांनी प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थिती दर्शविली. या महिला मेळाव्याचे अध्यक्ष येसूलाल उपराडे जिल्हाध्यक्ष भाजपा गोंदिया, उद्घाटक केशव मानकर माजी आमदार, भेरसिंगभाऊ नागपुरे माजी आमदार, विजय शिवणकर माजी अध्यक्ष जि.प. गोंदिया, वीरेंद्र अंजनकर संघटक मंत्री, संजय पुराम माजी आमदार, लायकराम भेंडारकर गटनेता जि.प. गोंदिया, प्रवीण दहिकर तालुकाध्यक्ष भाजपा देवरी, प्रमोद संगीडवार सभापती कृ.उ.बा.स देवरी, झामसिंग येरणे, अनिल येरणे जिल्हा महामंत्री, कल्पनाताई वालोदे सदस्य जि.प. गोंदिया, अंबिकाताई बंजार सभापती प.स. देवरी, अनिल बिसेन उपसभापती प.स. देवरी, या शालीकराम गुरनुले सदस्य प.स. देवरी, वैशाली पंधरे सदस्य प.स. देवरी, ममता अंबादे प.स.सदस्य, श्यामकला गावड सदस्य प.स.देवरी, अंजूताई बिसेन सरपंच ग्रा.पं. वडेगाव, सरस्वताबाई परतेकी ग्रामपंचायत सदस्य, तसेच मेळाव्याचे वक्ता म्हणून परिणीताताई परिणय फुके माजी नगरसेविका महानगरपालिका नागपूर, सविताताई पुराम सभापती महिला व बालकल्याण जि.प. गोंदिया यांच्यासह कार्यक्रमाचे देवकीताई मरई अध्यक्ष महिला आघाडी देवरी, अंजूताई बिसेन महामंत्री महिला आघाडी, कल्पनाताई गोस्वामी महिला आघाडी देवरी, लताताई बडोले महिला आघाडी देवरी यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी भव्य महिला मेळाव्याला देवरी आमगाव विधानसभा क्षेत्रातील महिला वर्गांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित दर्शविली होती. ॰॰॰॰॰








