निवडणूक कामामधून मुख्याध्यापक आणि प्राचार्यांना वगळा: मुख्याध्यापक संघाची मागणी

🔺माध्यमिक व उच्चमाध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे तहसीलदारांना निवेदन

देवरी: निवडणूक कामामधून मुख्याध्यापक आणि प्राचार्य यांना वगळण्याकरिता तहसीलदार / निवडणूक अधिकारी, ता. देवरी यांना माध्यमिक व उच्चमाध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाने तहसीलदारांना निवेदन सादर केले. येणाऱ्या सार्वजनिक निवडणुकी मधे विद्यालयातील सर्वच कर्मचाऱ्यांचा सहभाग करुन घेण्यात आलेला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांच्या सोबत विद्यालयात कुणीही राहणार नाही. तसेच प्राचार्य/मुख्याध्यापक यांना वेळोवेळी अनेक प्रकारची माहिती मागितली जाते. त्यामुळे किमान प्राचार्य/मुख्याध्यापक यांना निवडणुकीच्या कामात सहभागी करुन घेण्यात येऊ नये.करीता निवेदन देण्यात आले आहे.

माध्य. व उच्चमाध्य. शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मुख्याध्यापक सुभाष दुबे, कार्यवाह प्राचार्य जितेंद्र रहांगडाले , प्राचार्य विनोद गिरहेपूंजे, प्राचार्य जी. एम मेश्राम, प्राचार्य एस. एल शहारे, प्राचार्य रजिया बेग, डी एल नरेटी, के बी बोरकर, जी एस राऊत, प्राचार्य महेंद्र मेश्राम, प्राचार्य डॉ. सुजित टेटे, मुख्याध्यापक दिपक कापसे यांच्या सह तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक उपस्थित होते.

Share