एकलव्य मॉडेल रेसिडेन्सीयल स्कूल बोरगाव बाजार येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्सवात साजरा

Deori◾️एकलव्य मॉडेल रेसिडेन्सीयल स्कूल बोरगाव बाजार येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला यावेळी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले देवरी आमगाव विधानसभेचे आमदार माननीय श्री. सहसारामजी कोरोटे साहेब यांनी त्यांच्या भाषणात नुकत्याच शाळेच्या उज्वल यशाबद्दल व या शाळेची विद्यार्थिनी कुमारी. कल्याणी बलदेव कोटवार या विद्यार्थिनीचा नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नागपूर येथे प्रवेश मिळाल्यामुळे तिचा सत्कार राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला याबद्दल पण इतर आदिवासी विद्यार्थ्यांनी अशीच यशाची परंपरा कायम ठेवण्याबाबत आपले मनोगत व्यक्त केले व आदिवासी बांधवांनी आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण देणाऱ्या एकलव्य निवासी शाळेतील सर्व कर्मचारी यांचे विशेष अभिनंदन केले की विद्यार्थी इंग्रजी मधून स्वतःचे मनोगत व्यक्त करतात याचा मला आज खूप आनंद झाला अशी भावना व्यक्त केली.
शाळेचे प्राचार्य श्री. संजय बोंतावार सर यांनी आपल्या मनोगतात शाळेचा मागील तीन वर्षापासून शंभर टक्के निकाल व मिशन शिखर JEE व NEET यांच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय उपक्रम आणि नाविन्यपूर्ण उपक्रम सुपरवायज स्टडी आणि अतिरिक्त तासिका यांचे नियोजनाच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक युगात आपली वेगळी ओळख निर्माण केली पाहिजे यासाठी सर्व प्रयत्न चालू असल्याचे सांगितले तसेच भविष्यात आदिवासी विद्यार्थी हा सर्वगणसंपन्न तयार करण्याचा त्यांचा मानस त्यांनी आपल्या मनोकातून व्यक्त केला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय श्री. संजय जाळे, उपाध्यक्ष श्रीमती. दामिनी ताई नरेटी उपस्थित होते. जागतिक आदिवासी दिनानिमित्त शाळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आणि विशेष आकर्षण म्हणजे आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणारा देखावा उभारून गावातून प्रभात फेरी काढण्यात आली यामध्ये पंचक्रोशातील गावकरी पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणातील उच्च संधी यावर आधारित पथनाट्य गावच्या प्रमुख ठिकाणी सादरीकरण करण्यात आले शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक या जागतिक आदिवासी दिनानिमित्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील विद्यार्थिनी कुमारी ज्योती भोयर व प्रणाली राऊत यांनी केली. तर सांस्कृतिक विभाग प्रमुख म्हणून कु. काजल या शिक्षिकेने काम पाहिले त्याचबरोबर शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी श्री. संजीवकुमार इलमे, विजयकुमार मोरे, मोनिका उत्तम, ललित शर्मा, उत्तम पांडे, पवार दौलत, राजकुमार, परवेज, नितीन रौथान, वैशाली तोमर, वैशाली नवखरे, अभिषेक गवई, नरेश कुमार, लवली जार, अमोल धोंगडे, दत्ता लिंबोरे, प्रियंका वाघमारे, मोनिका, शितल, नरेंद्र जाधव, उमेश कुमावत, मनोज कुमार, शिवचंद्र पवार, पालेन्द्र गावळ, लीना ढवळे, राकेश गावराने आणि चंद्रपाल कोरोंडे यांचे सहकार्य लाभले.

Share