नवेगावबांध-गोठणगाव मार्गावरील पूल कोसळला

अर्जुनी मोरगाव ◾️तालुक्यातील नवेगावबांध-गोठणगाव या मुख्य मार्गावरील तलावाजवळील पूल 1 ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजताच्या दरम्यान खचला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाली असून एसटी बसेस सुद्धा बंद झाल्याने अनेक गावाचा संपर्क तुटला आहे. तसेच या मार्गाची वाहतूक नवेगावबांध, कवठा, काळीमातीवरून गोठणगावकडे वळविण्यात आली आहे.

तालुक्यातील नवेगावबांधवरून गोठणगाव, केशोरीमार्गे गडचिरोली जिल्ह्याला जोडणार्‍या या राज्य महामार्गावरील गोठणगाव तलावाजवळील पूल 1 ऑगस्ट रोजी रात्री दहाच्या दरम्यान पूर्णतः कोसळल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने एका चारचाकी वाहनातील दोन ते तीन जणांचा जीव वाचला. या मार्गावरून परिसरातील शेकडो गावातील नागरिक नवेगावबांध बाजारपेठ तसेच गोंदिया जिल्ह्याशी शासकीय तथा खाजगी कामासाठी ये-जा करतात. या मार्गावर वाहनाची मोठी वर्दळ असते. गेल्या अनेक वर्षापासून या मार्गाचे रुंदीकरन मंजूर आहे. मात्र वन विभागाने आडकाठी धोरणामुळे रस्ता बांधकामात प्रलंबित आहे. लोकप्रतिनिधींनी ही समस्या सोडविण्याचे आश्‍वासन जनतेला दिले. मात्र ते आश्‍वासन हवेतच विरले. परिणामी या पद्धतीच्या घटना आणि त्या घटनांमध्ये लोकांचा जीव गेल्यानंतर शासन रस्ता बांधकामाला परवानगी देणार कां? हा प्रश्‍न या निमित्ताने समोर आला आहे. विशेष म्हणजे, पुल खचल्याने हा मार्ग बंद झाला असून या मार्गावरील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बसेस मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे ताबडतोब हा पूल उभा करून इतरही पूल व नव्याने रस्त्याचे रुंदीकरणाला सुरू करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें