नेत्र तपासणी, चष्मे वाटप, मोतीया बिंदू शस्त्रक्रिया शिबिर
गोंदिया◾️आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार संजय पुराम यांच्या वाढदिवसानिमित्त श्री स्वामी समर्थ नेत्रालय नागपूर, जिल्हा अंधत्व नियंत्रण समिती गोंदिया, मित्र परिवाराच्या वतीने नेत्र तपासणी, चष्मे वाटप व मोतियाबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन सालेकसा येथील पुर्ती पब्लीक स्कूल येथे ६ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजपर्यंत करण्यात आले आहे. शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूद्वारे तपासणी करून मोफत चष्मे व मोतियाबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
शिबिरात श्री स्वामी समर्थ नेत्रालय नागपूर येथील तज्ञ डॉक्टरांकडून डोळयांची तपासणी करण्यात येईल. तपासणी नंतर चष्याचा नंबर देण्यात येईल व गरजू रुग्णांना चष्मे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच मोतीबिंदु असल्यांवर मोफत शस्त्रक्रिया गोंदिया येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात केली जाणार आहे. मोतीबिंदुच्या शस्त्रक्रियेसाठी स्वतःचे मतदान ओळखपत्र रुग्णांना सोबत घेणे आवश्यक आहे. क्षेत्रातील नागरिकांनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिपच्या महिला व बालकल्याण सभापती सविता संजय पुराम व मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी सविता पुराम, डॉ. राजेंद्र बडोले, देवराम चुटे, शुभम फुंडे, सरोज परतेती, राजेंद्र ब्राम्हणकर, नितेश वालोदे, राम चक्रवती यांच्याशी संपर्क साधावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.