मनोहरभाई पटेल विज्ञान व कला कनिष्ठ महाविद्यालय देवरी येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

देवरी◾️स्थानिक मनोहरभाई पटेल विज्ञान व कला कनिष्ठ महाविद्यालय देवरी येथे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथीचा कार्यक्रम घेण्यात आला.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक माननीय जी. एम.मेश्राम , प्रमुख उपस्थितीत प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक माननीय व्ही.एस.गेडाम तसेच पर्यवेक्षक डी.एस.ढवळे प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी सर्व मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.जी एम. मेश्राम सर यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्यविश्वातले योगदान प्रेरक, परीवर्तनवादी आहेत.याआशयाचे भाषण केले.
अशा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख जे.जी. खेडकर यांनी केले, तर आभार एस. आर. निमजे सरांनी मानले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

Share