ग्रामगीता जीवन-विकास परीक्षेत ब्लॉसम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे सुयश

देवरी २५: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळ द्वारा संचालित (रजि.नं.एफ्/१६२, दि.१५/११/१९६३) द्वारा ग्रामगीता जीवन-विकास परीक्षा २०२३-२४ चे आयोजन श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम, जि. अमरावती (महाराष्ट्र) यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले होते.
जीवन-विकासाचे शिक्षण। गावीच असावे सर्वसंपन्न । आपुल्याचि ग्रामरचनेचे आयोजन । शोभवाया शिकवावे ।।या उक्तीला प्रेरणास्रोत मानून ग्रामगीता जीवन-विकास परीक्षा विभागाद्वारे ब्लॉसम पब्लिक स्कूल देवरी येथे परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये दिव्यांशी रामटेके प्रथम, निया तिवारी प्रथम, प्रतीक्षा पटले द्वितीय, आर्या खंडाते द्वितीय, चिराग आंबीलकर द्वितीय, युगांतर शेंद्रे तृतीय, स्नेहा डुंभरे, मोनीत रोकडे, अनन्या असाटी, कनक बघेल, रौनक मडावी यांनी यश संपादन केले आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे अखिल भारतीय गुरुदेव सेवामंडळाचे सदस्य कुलदीप लांजेवार, प्राचार्य डॉ. सुजित टेटे, परीक्षा प्रमुख स्वप्नील पंचभाई यांनी अभिनंदन केले.

Share