अखिल भारतीय विज्ञान मेळावा २०२४ मधे ब्लॉसमची आस्था अग्रवाल द्वितीय

देवरी ◼️प्रादेशिक विद्याप्राधिकरण नागपूरव राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था नागपूर द्वारा तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्याचे आयोजन २२ जुलै ला समुह साधन येथे करण्यात आले होते. यामध्ये ब्लॉसम पब्लिक स्कूल देवरीची आस्था मुकेश अग्रवाल वर्ग ९ वा हिने द्वितीय क्रमांक पटकावला असून यश संपादन केला आहे.

शाळेचे प्राचार्य डॉ. सुजित टेटे यांच्या मार्गदर्शनात विज्ञान शिक्षका तेजस्विनी नंदेश्वर यांनी “Artificial Intelligence : Potentials & Concerns ” या विषयावर विद्यार्थिनीला मार्गदर्शन करुन स्पर्धेत सहभागी केले होते. यावेळी अनेक शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते. सदर विज्ञान मेळाव्याचे मूल्यांकन प्राध्यापक डॉ. रोशन नासरे यांनी केले. आस्था ने आपल्या यशाचे श्रेय शाळेचे प्राचार्य डॉ. सुजित टेटे, विज्ञान शिक्षिका तेजस्विनी नंदेश्वर , आई वडील यांना दिले आहे.

सदर विज्ञान मेळाव्याचे आयोजन महेंद मोटघरे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती, देवरी यांच्या मार्गदर्शनात समुह साधन केंद्र देवरी येथे करण्यात आले. सदर कार्यक्रमाचा मुर्तरुप देण्यासाठी तालुका विज्ञान विभाग प्रमुख व्ही. डब्लू. लोथे यांनी मोलाची भूमिका बजावली.

Share