सुरतोली विद्यालयात शालेय मंत्रिमंडळ गठित

देवरी: (प्रहार टाईम्स ) सुरतोली माध्यमिक विद्यालय लोहारा येथे शालेय मंत्रिमंडळ निवडणूक घेण्यात आली. विद्यार्थ्यांना लोकशाहीची जाणीव व्हावी या हेतूने लोकशाही पद्धतीने निवडणूक घेण्यात आली या निवडणुकीत अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक एस.बी.दुबे ,मतदान अधकारी १ सोनग्रे सर , मतदान अधकारी २ अलकादुबे ,मतदान अधकारी शहनाज मिर्झा यांनी मतदानाचे कार्य पार पाडले.या निवडणुकीत वर्ग ५ते वर्ग १० पर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी मतदान केले.मतदानाचे मोजणी झाल्यानंतर खालील प्रमाणे विद्यार्थी मंत्रिमंडळ निवडण्यात आले.शाळा नायिका वर्ग १० ची विद्यार्थीनी कु.माधवी वाघाडे शालेय उपनायक वर्ग नववी चा विद्यार्थी पार्थिव बावणे , विद्यार्थी प्रतीनिधी कू. तुलसी वालापुरे, सांस्कृतिक प्रमुख वंदना गौतम उपप्रमुख पालक हुलके , आरोग्य प्रमुख प्राची शेंडे, उपप्रमुख सौम्य बघेल,सहल प्रमुख विद्या घासले, स्वच्छत प्रमुख रंजू कुथिर, परस बाग प्रमुख दीपशिखा गौतम पोषण आहार प्रमुख मानसी परीहार, क्रीडा प्रमुख चैतन्य सोंनग्रे , उपप्रमुख यश पवारनिवडून आलेल्या सर्व विद्यार्थी मंत्र्यांचे पुष्प देऊन मुख्याध्यापक श्री. दुबे सर यांनी अभिनंदन केले.
निवडून आलेल्या विद्यार्थ्यांनी कामे कशी करायची शिक्षकांना मदत केव्हा करावी शिश्त व स्वच्छ परिसर ठेवण्यासाठी निवडून आलेल्या विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांनी सहकार्य करावे.असे मार्गदर्शन मुख्याध्यापक एस बी दुबे सरांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.धूर्वे सर सयाम सर लटये मॅडम यांनी सहकार्य केले.

Share