देवरी: बाघनदीच्या पूरात ट्रॅक्टर गेले वाहून , सिलापुर येथील घटना

◼️देवरी तालुक्यातील पहिली घटना

देवरी◼️ तालुक्यातील शिलापूर- पुराडा मार्गावरील बाघनदीच्या पुरात ट्रॅक्टर वाहून गेल्याची घटना घडली. यामध्ये ट्रॅक्टर चालकाचा अति शहाणपणा जीवावर बेतला असून कृष्णा मारोती वल्थरे (३०) रा पद्मपुर असे ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे. त्याला स्वतःचे जीव वाचविण्यात यश आले असून ट्रॅक्टर बाघनदीला वाहून गेले आहे.

प्राप्त माहिती नुसार शेतीच्या कामासाठी सदर ट्रैक्टर रोजंदारीच्या महिलांना सोडायला गेले होते. पुलावरुन पुराचे पाणी जात असतांना सुद्धा चालकाने अती आत्मविश्वासाने पुराच्या पाण्यात ट्रॅक्टर नेले. शिरपूरच्या मनोहर सागर धरणाचे वक्र दरवाजे उघडण्यात आल्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून यामध्ये ट्रॅक्टर वाहून गेले.

विशेष म्हणजे देवरी पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे यांनी तालुक्यातील पूर परिस्थितीची पाहणी केली होती. सदर घटनास्थळी अनेक वर्षापासून पुलाची मागणी केली जात असून लोकप्रतिनिधी याकडे सर्रास दुर्लक्ष करीत असल्याचे परिसरातील लोकांचे म्हणणे आहे. सामान्य जनतेनी या ठिकाणी पुलाची मागणी केलेली आहे.

Share