शांताबाई पुर्व माध्य. शाळा, कुणबीटोला ककोडी येथे गुरुपौर्णिमा उत्सव साजरा

देवरी: तालुक्यातीलम छत्तीसगड सिमेवरील शांताबाई पूर्व माध्यमिक शाळा, कुणबीटोला ककोडी येथे मुख्याध्यापक व्हि.एस. बावनथडे यांच्या मार्गद‌र्शनाखाली गुरुपोर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षक डि.एस.पुडके, सौ.ने.बी.मेश्राम, डि.एच. मडावी, एम.डी.कुंभरे, जे.पी.कानतोडे तसेच १ते८ ची सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते. शिक्षकांनी मुलांना आपल्या मार्गदर्शनात गुरुचे महत्त्व सांगितले विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून गुरुः शिष्य यांची पुरातन प्रचलित कथा सांगीतल्या. विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांना स्वहस्तलिखीत भेट कार्ड भेट दिले. यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सांस्कृतीक प्रमुख सौ.ने.बी.मेश्राम तर एम.डी कुमरे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशासाठी इतर शिक्षकांनी सहकार्य केले.

Share