सायकल चालवून पर्यावरण रक्षणाचा संदेश

गोंदिया: शहरात सात वर्षापुर्वी स्थापन केलेल्या सायकलिंग संडे समूहाद्वारे रविवार 16 जून रोजी आयोजित उपक्रमात जिल्हाधिकारी प्रतिज नायर यांनी सहभाग घेत सायकल चालवून पर्यावरण रक्षण व निरोगी आरोग्याचा संदेश दिला. सायकलिंग संडे ग्रुपला 16 जून रोजी 7 वर्ष पूर्ण झाली. सकाळी 6 वाजे रेलटोली गुरुद्वारा येथून सायकलिंग संडे मोहिमेला सुरवात झाली. गोंदिया विधान सभा व्हॉट्सप ग्रुपने हिरवी झेंडी दाखवून सायकलिंग ला सुरवात झाली. गुरुद्वारा ते नागर येथील शिव मंदिरपर्यंत व येथून गोंदिया येथील विश्राम गृहपर्यंत सायकल चालवून पर्यावरण रक्षण व निरोगी आरोग्याचा संदेश जिल्हाधिकारी यांनी दिला.

सायकलिंग संडेच्या वर्धापन दिनानिमीत्त जिल्हाधिकारी प्रतिज नायर, सायकलिंग संडे ग्रुपचे अध्यक्ष मंजु कटरे, सचिव रवि सपाटे, कोषाध्यक्ष विजय येडे यांनी केक कापून वर्धापन दीन साजरा केला. आज ग्लोबल वार्मिंगची समस्या निर्माण झाली आहे. येणार्‍या पिढीला अनेक समस्या निर्माण होऊ शकतात, म्हणून गोंदियातील युवकयुवती आणि वयोवृद्धांनी पुढे येत एक दिन सायकल के नाम, संडे सायकल ग्रुपची स्थापना केली. दर सविवारी सायकल चालवून शहर, गावांमध्ये फिरून पर्यावरण रक्षण व सुद़ृढ आरोग्याचा संदेश 7 देत आहेत. 16 जून रोजी संडे सायकलींग ग्रुपला 7 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल जिल्हाधिकारी नायर यांनी मोहिमेत सहभाग घेत सायकल चालवून नागरिकांना प्रोत्साहित केले. आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी सायकल चालवावी, यामुळे मानवाचे आरोग्य तर चागले राहिलच व पर्यावरणाचे रक्षण होईल. या उपक्रमात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नायर यांनी केले. यावेळी 82 वर्षीय मुन्ना यादव, जितेंद्र खरवडे, अजित शेनमारे, अरुण बंनाटे, दीपक गाडेकर, नवीन दहीकर, आर्यन कुंभलवार, हितेंद्र खरवडे, आशा तिडके, श्रद्धा यादव, दिपाली वाढई, त्रिवेणी उके, पुष्पा घोडेस्वार, भूमी खटवाणी आदींसह बहुसंख्य युवकयुवती व नागरिकांनी सहभाग घेतला.

Share