श्रीमती के.एस.जैन विद्यालय देवरीचा निकाल ९३.६६ टक्के, साक्षात कुर्वे प्रथम

देवरी◼️देवरी येथील श्रीमती के.एस.जैन विद्यालयाचा १२ च्या परीक्षेत विद्यालयाचा संपूर्ण निकाल हा ९३.६६ टक्के लागला.
या परीक्षेत विज्ञान शाखेतून देवरीचा साक्षात अनिल कुर्वे ८१.८३ टक्के गुण प्राप्त करून विद्यालयातून प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. तर एकांशू शर्मा ७९.१७ टक्के गुण घेऊन द्वितीय क्रमांक आणि भूमिका काळे हिने ७३.५०टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक पटकाविला आहे. कला शाखेतून मनिषा येल्ले ६६.६७ टक्के प्रथम , वैशाली मालते ६२.८३, एकनाथ मडावी ६१.८३ टक्के मिळविले आहे.

ह्या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्राचार्या रझिया बेग, महेशकुमार जैन शिक्षण समिती अध्यक्ष, उच्च माध्यमिक शिक्षक – अनिल कुर्वे, एल. एस. सोनेवाने, उर्मिला परिहार. वाय. एन. बिसेन, एन.वाय. पटले, डी. एम. मसराम, अर्चना मुनीश्वर, एस. एम. लांजेवार व त्यांच्या पालकांचे अभिनंदन आणी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक क्षेत्रात यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.

Print Friendly, PDF & Email
Share