गौ तस्करावर देवरी पोलिसांची कारवाई

देवरी: तालुक्यात अवैद्य गौतस्करीच्या घटनेत वाढ झाली असून ग्रामीण भागातून मोठ्याप्रमाणात गुरांची तस्करीचे रैकेट सक्रिय आहे. देवरी पोलिसांनी १३ मे रोजी सकाळी महामार्ग रोड क्र. ५३ येथील पुतडी गेट नाकाबंदी करून ट्रकमध्ये भरून कत्तलखान्यात नेत असलेल्या १६ गुरांचे प्राण वाचवले.  या कारवाईत १६ गुरे व एक ट्रक असा १० लाख ९६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी छापे टाकण्यात येत आहेत. 

देवरी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी महामार्गवर आमगावहून नागपूरकडे जाणारा वाहन MH 40- CD 4920 थांवबला होता. सदर वाहनाची तपासणी केली असता त्यात १६ गुरे आढळून आली. सदर वाहनाला जप्त करण्यात आले असून पुढील कार्यवाही देवरी पोलिस करीत आहेत.  

Share