शासकीय हमीभाव केंद्र तात्काळ सुरू करा – आ. सहषराम कोरोटे

◼️अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या प्रधान सचिवाला दिले निवेदन

देवरी ◼️२०२३-२४ या वर्षातील रब्बी हंगामात धान पीक निघून पंधरवड्याचा कालावधी झाला. मात्र, तालुक्यात शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना कमी भावाने धानाची विक्री व्यापाऱ्यांना करावी लागत आहे. परिणामी शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. शेतकऱ्यांची ही आर्थिक पिळवणूक थांबविण्यासाठी त्वरित शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करावे. अशी मागणी आज ता.०८ रोजी देवरी आमगाव विधानसभा क्षेत्राचे आ. सहसराम कोरोटे यांनी प्रधान सचिव, अन्न व नागरी पुरवठा विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

गोंदिया जिल्ह्यातील व आमगाव विधानसभा क्षेत्रातील मार्केटिंग फेडरेशनचे खरीप हंगामाचे धान गोडाऊन मध्ये मोठ्या प्रमाणात पडून आहे. त्याचप्रमाणे आदिवासी सहकारी संस्थाचे लाखो टन धान उघड्यावर पडून आहे. त्याची उचल आजपर्यंत झालेली नाही. पावसाळा जवळ येत असून, अशीच परिस्थिती राहिली तर शासनाने कोठ्यावधी रुपयाचे नुकसान होईल, व संस्था चालकांवर होणारा घट तुटीचा बोजा वाढेल.

करिता मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी धान खरेदी संस्था यांची घट तूट मंजूर करून तात्काळ धानाची उचल करून शासनाचे होणारे कोट्यावधी रुपयाचे नुकसान टाळावे व रब्बी हंगामाचे धान खरेदी त्वरित सुरू करावी. याकरिता, देवरी आमगाव विधानसभा आ. सहसराम कोरोटे यांनी प्रधान सचिव, मुंबई येथे निवेदन सादर केले

“ संततधार पावसामुळे यापूर्वी शेतकऱ्यांकडील धानाची प्रत खालावली आहे. त्याचाही उत्पन्नावर परिणाम होणार आहे. व्यापारीदेखील याच कारणामुळे कमी दराने धान खरेदी करीत आहेत. हमीभाव खरेदी केंद्र सुरू झाल्यास काही अशी स्पर्धा वाढून दरात तेजी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या संदर्भाने वेळीच निर्णय घेण्यात यावा. गोंदिया जिल्ह्यातील आणि आमगाव विधानसभा क्षेत्रातील मार्केटिंग फेडरेशन, आदिवासी सोसायटी आणि धान खरेदी संस्थेच्या धानाची उचल करून, ताबडतोब रब्बी हंगामाचे धान खरेदी सुरू करावी अशी मागणी केली आहे. “

Print Friendly, PDF & Email
Share