देवरी -आदर्श गावातील पाणीपुरवठा योजना रखडली

देवरी◼️ देवरी तालुक्यातील आदर्श आमगावात गाजावाजा करीत सुरु केलेली जलजीवन मिशन योजना सहा महिन्यांपासून रखडलेली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी आदिवासी महिलांना दोन किमी पायपीट करावी लागत असून कोट्यवधी खर्च करुनही आदिवासींचे हाल होताना दिसत आहे. 

देवरी तालुक्यातील अनेक गावांत दीड वर्षापूर्वी जलजीवन मिशन योजनेतंर्गत कामे हाती घेण्यात आली. मात्र अनेक गावांतील कामे अद्यापही अपूर्ण असल्याने आदिवासी भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. तालुक्यातील आमगाव येथील आदिवासी नागरिकांवरही ही वेळ आली आहे. आमगाव येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना हाती घेण्यात आली. परंतु ही योजना रखड्याने आदिवासी महिलांना दोन किमी पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. यासंदर्भात लोकप्रतिनिधींसह स्थानिक नागरिकांनी योजनेतंर्गत होणार्‍या कामाची तपासणी करावी, कामातील अनियमीतता असल्याचा आरोप केला असून योजना पूर्ण होण्याची प्रतिक्षा आहे. योजनेचे काम पूर्ण करण्याचे कंत्राट घेतलेल्या कंत्राटदारवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

देवरी तालुक्यातील सुरु असलेल्या जलजीवन मिशन योजनेतंर्गत अनेक कामे अद्यापही अपूर्ण आहेत. परिणामी नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. आमगाव हे गाव फक्त प्रतिनिधीक उदाहरण आहे. गावासमोर आदर्श नावाचा उल्लेख असला तरी येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. अशीच स्थिती तालुक्यातील अनेक गावांत पहायला मिळते.

Print Friendly, PDF & Email
Share