विवाह सोहळ्यातून समाजात ऐकतेचे दर्शन: संजय पुराम

Amgaon : कुणबी समाज सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन ऐकतेचे प्रतीक आहे. सामाजिक बांधिलकीतून समाजाचे ऋण फेडण्याचा हा एकमात्र उपक्रम आहे, असे प्रतिपाद माजी आ. संजय पुराम यांनी केले.ते स्थानिक कुणबी समाज सेवा समितीतर्फे आयोजित सामूहिक विवाह सोहळ्याप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमांची सुरुवात दीप प्रज्वल करून संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली. याप्रसंगी आ. सहेषराम कोरोटे, कुणबी समाज सेवा समितीचे अध्यक्ष विजय शिवणकर, माजी आ. भेरसिह नागपुरे, माजी जिप अध्यक्ष उषा मेंढे, माजी म्हाडा सभापती नरेश माहेश्‍वरी, कांग्रेस तालुका अध्यक्ष संजय बहेकार, जिप सदस्य सुरेश हर्षे, छबूताई उके, वंदना काळे, किशोर महारवाडे, हनुवंत वट्टी, राजेंद्र गौतम, लता दोनोडे, बाबुलाल दोनोडे, काशीराम शिवणकर, शंकर मडावी, देवराम चुटे, समितीचे सचिव उमेश मेंढे, सहसचिव राजेश शिवणकर, सदस्य राजकुमार फुंडे, बाजार समितीचे संचालक टिकाराम मेंढे, शशिकला दोनोडे, विवाह प्रबंधन समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. एस. डी. बागडे, सांस्कृतिक समितीचे सी. जी. पाऊलझगडे, जगमोहन पाथोडे, रिद्धीराम मेंढे, माजी सरपंच धनीराम मटाले, वनरक्षक जीवनप्रकाश मेंढे प्रामुख्याने उपस्थित होते. प्रास्ताविक शालिक येटरे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन देवराज बहेकार, सुरेंद्र मेंढे तर आभार सहसचिव राजेश शिवणकर यांनी मानले.

Print Friendly, PDF & Email
Share