नेटवर्क अभावी रोहयो मजुरांची हजेरी ऑफलाईन घ्या
देवरी◼️ देवरी व सालेकसा तालुक्यात सुरु असलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामावरील मजुरांची हजेरी ऑललाईन करण्यात यावी, अशी मागणी मजुरांकडून करण्यात येत आहे.देवरी व सालेकसा हे तालुके जंगल, डोंगराने व्यापलेला असून आदिवसीबहूल आहे. आजही अनेक मुलभूत सोयी गरज आहे.
शासनाने तालुक्यातील विविध विकास कामे रोहयोच्या माध्यमातून हाती घेतली असल्याने स्थानिक मजुरांना रोजगार देखील उपलब्ध होत आहे. मात्र शासनाच्या निर्देशानुसार रोहयो कामावरील मजुरांची हजेरी ही ऑनलाईन घेणे आवश्यक आहे. मात्र, या दोन्ही तालुक्यातील इंटरनेट नेटवर्कची मोठी समस्या आहे. या समस्यांचा सामना सर्वसामान्य नागरिकांसह सहन करावा लागत असून शासकीय व निमशासकीय विभागांनाही याचा फटका बसतो. रोहयोच्या मजुरांची हजेरी देखील याला अपवाद नाही. हजेरीवर नोंद झाल्याशिवाय मजुरांची मजुरी दिली जात नाही. त्यामुळे दोन्ही तालुक्यातील रोहयो कामावरील मजुरांची हजेरी ऑफलाईन घेण्यात यावी, अशी मागणी होत आहे.