चार अवैध व्यावसायिक जिल्ह्यातून हद्दपार

गोंदिया⬛️लोकसभा निवडणूक तसेच आगामी सण उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने तिरोडा उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकार्‍यांनी 4 अवैध व्यावसाय करणार्‍या सराईत गुन्हेगारांना 1 महिन्याकरिता जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.

तिरोडा येथील संत रवीदास वॉर्डातील सूरज प्रकाश बरियेकर व अखिल रहीम खान पठाण, लाखेगाव येथील नितीन मोहन देशमुख व काचेवानी येथील निलेश सुभाष कराडे हे तिरोडा पोलिस स्टेशन हद्दीमध्ये वारंवार दारू विक्रीचे व जुगाराचे गुन्हे करत होते. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून सुध्दा त्यांच्या वागणुकीत व सवयीत काहीही परिणाम होत नव्हता. त्यांच्या अवैध धांद्याच्या कृतीमुळे जिल्ह्यांतील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाले असल्याने तसेच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर तिरोडाचे ठाणेदार पोलिस निरीक्षक देवीदास कठाळे यांनी चारही गुन्हेगारांना जिल्ह्यातून तडीपार करण्याचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी पुजा गायकवाड यांना यांनी मंजूरीकरिता सादर केला होता. दरम्यान या प्रस्तावाची चौकशी करुन उपविभागीय पोलिस अधिकार्‍यांनी चारही आरोपींना जिल्ह्यातून हद्दपार करण्याची शिफारस केली होती. दरम्यान उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी पुजा गायकवाड यांनी चारही आरोपींना एक महिना कालावधीसाठी जिल्ह्यातून हद्दपारचे आदेश दिले आहेत.

Share