1 पिस्टलसह जीवंत काडतूस, 5 तलवारी, 1 गुप्ती जप्त
गोंदिया⬛️आगामी लोकसभा निवडणूक व सन-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्हा पोलिसांचे 23 व 24 मार्च दरम्यान कोंबिंग ऑपरेशन राबविले. यात 1 पिस्टल, 1 जीवंत काडतूस, 5 तलवारी, 1 गुप्ती जप्त करुन अवैध दारु 52, जुगार 2 व 56 अवैध कृत्य करणार्यावर अवैध कृत्य करणार्या गुन्हेगारांवर केली प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा व गोंदियाच्या उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी बानकर यांच्या मार्गदर्शनात कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखा, शहर पोलिस, रामनगर पोलिस व ग्रामीण पोलिस, सी 60 पथकाने हे ऑपरेशन राबविले. शहरात पोलिस निरीक्षक दिनेश लबाडे, पोलिस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात पैकनटोली, गौतमनगर, कुंभारेनगर, सावराटोली, छोटा गोंदिया, रामनगर, कुडवा, जब्बारटोला या परिसरातील रेकॉर्डवरील व सर्व सराईत गुन्हेगारांची चौकशी करुन त्यांच्या घराची झाडाझडती घेतली. यादरम्यान पैकनटोली येथे अतिश संतोष करोसीया (30) यांच्या घरातून 3 जुन्या तलवारी, वॉर्ड क्र. 1 मध्ये कांतीलाल सुरजलाल ढोमणे (46) याच्या घरातून 1 लोखंडी तलवा व 1 गुप्ती, वाजपेयी वॉर्डामध्ये शुभम पुरुषोत्तम हरदीये (25) याच्या घरातून 1ी पिस्टल मॅग्जीनसह व 1 जीवंत काडतूस, पैकनटोली येथे पंकज कुमार चंद्रप्रकाश उर्फ संतोष आग्रे (19) याच्या घरातून लोखंडी तलवार असे एकूण 53 हजार 730 रुपये किमतीचे शस्त्रे जप्त केली.
तसेच जिल्ह्यातील पोलिस ठाण्यातंर्गत अवैध दारुबंदी कायद्यानवे 52 जणांवर कारवाया, एनडीपीएस कायद्यातंर्गत 2, जुगार कायद्यातंर्गत 2 कारवाया करुन 3 लाख 74 हजार 974 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याचप्रमाणे अवैध कृती करणार्यांविरुध्द कलम 110 अंतर्गत 3 कारवाया, कलम 93 अंतर्गत 12 जणांवर कारवाई, कलम 110, 112, 117 मपोकाअंतर्गत 1 कारवाई व कलम 107 अंतर्गत 40 जणांवर कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे शहर व जिल्ह्यातील गुन्हेगार व गावगुंडांचे धाबे दणाणले आहे.