आदर्श आचार संहिता निर्देशाचे तंतोतंत पालन करण्यासाठी देवरी पोलीसांचे पथसंचलन
प्रहार टाईम्स
देवरी पोलीस स्टेशन देवरी येथे आगामी लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने जाहीर झालेल्या आदर्श आचार संहिता निर्देशाचे तंतोतंत पालन झाले पाहिजे तसेच होळी/ धुलीवंदन , रामनवमी ,रमजान ईद ,बाबासाहेब आंबेडकर जयंती, उत्सव शांततेत पार पाडले पाहिजे तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी या अनुषंगाने देवरी शहरातील मुख्य मार्गाने व मुख्य चौकातून पोलीस स्टेशन येथील अधिकारी व अमलदार व सैनिक यांचे सह पथसंचलन करण्यात आले. सदर पथसंचलना 03 अधिकारी 30 अंमलदार व 17 सैनिक हजर होते.
दरम्यान पोलीस स्टेशन देवरी येथे विवेक पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी यांचे उपस्थित देवरी परिसरातील शांतता समिती व महिला दक्षता समिती , मोहल्ला समिती व नगरपंचायत देवरी येथील सदस्य यांची बैठक घेण्यात आली. सदर बैठकीदरम्यान लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने होळी /धुलीवंदन, शिवजयंती ,रामनवमी ,रमजान ईद ,बाबासाहेब आंबेडकर जयंती ,उत्सव शांतते पार पाडले पाहिजे व कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावे याबाबत चर्चा करण्यात आल्या.

यावेळी सदर उपपोलीस विभागीय पोलिस अधिकारी विवेक पाटील, पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे, सपोनि गंगकाचूर, सपोनि गीता मुळे आदि उपस्थित होते.