मार्चमध्येच पारा वाढला,

गोंदिया⬛️ सूर्यनारायणाने आपला प्रकोप दाखवायला सुरुवात केली आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यात उकाडा जाणवायला सुरुवात झाली असून तापमान 36 अंश सेल्सिअसवर पोहचले आहे. दरम्यान मार्च अखेरपर्यंत तापमान 40 अंशापर्यंत पोहोचेल असे संकेत हवामान खात्याने दिले आहे. जिल्ह्यात जंगलाचे मोठे प्रमाण असले तरी उन्हाळ्यात कमाल तापमान 45 अंश सेल्सिअसच्या वर नोंदविल्या जाते. साधारणपणे एप्रिल महिन्यापासून उन्हाळ्याची चाहूल लागते. मात्र यंदा मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. महिन्याच्या सुरुवातीला काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला. मात्र त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला.

सध्या दिवसाचा उकाडा व रात्री गारवा असे तापमान जिल्ह्यात आहे. मागील आठवड्यापासून तापमाप वाढत असून आज, 10 मार्च रोजी कमाल तापमान 36 अशं सेल्सिअस व किमान तापमान 18 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. विशेष म्हणजे येत्या काही दिवसांत राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे मार्चपर्यंत जिल्ह्याचे तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. दरम्यान, उन्हाळ्याची चाहूल मार्चच्या सुरुवातीपासूनच लागल्याने नागरिकांनी गारवा देणारे कुलर, हिरवे पडदे, माठ-सुरई आदी खरेदीला सुरुवात केली आहे. तर शहरासह ग्रामीण भागात रसवंती व थंडपेये विकणारे फेरीवाले पहायला मिळत आहेत.

Print Friendly, PDF & Email
Share