पाच किलो गांजासह एकास अटक

गोंदिया⬛️रायपूर येथून गोंदियात विक्रीसाठी आणलेला 1 किलो 140 ग्रॅम गांजासह एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. रॉबिन पटलिया, रा.रायपूर असे आरोपीचे नाव आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने 9 मार्च रोजी रात्री 8 वाजता रेलटोली मालधक्का परिसरात केली. रायपूर येथील एक व्यक्ती रेल्वेने गोंदियातील रामनगर परिसरात गांजा विक्रीसाठी येत असल्याची माहिती पोलिस हवालदार राजेंद्र मिश्रा यांना मिळाली. या माहितीच्या आधारे रामनगर पोलिस ठाणे हद्दीतील रेलटोली मालधक्का परिसरात आवश्यक साहित्य, पंच घेऊन पोलिसांनी सापळा रचला.

दरम्यान रात्री 0 वाजता रॉबिन उर्फ दिपलाल चैनलाल पटलिया, (46) रा. सुरजनगर, रायपूर याला संशयास्पदरित्या हालचाली करताना पाहून ताब्यात घेतले. त्याच्याजवळील बॅग तपासल्या असता त्यामध्ये जांभळ्या रंगाच्या बॅगमध्ये सेलोटेपने गुडाळलेले 2 व गुलाबी रंगाच्या बॅगमध्ये 3 बंडलमध्ये गांजा सापडली. या गांजाचे वजन 5 किलो 140 ग्रॅम असून किंमत 1 लाख 28 हजार 600 रुपये आहे. पोलिसांनी गांजा जप्त करुन आरोपीवर एनडीपीएस कायदा कलम 8 (क) 20, 29 अन्वये गुन्हा दाखल करुन अटक केली. पुढील तपास रामनगर पोलिस करीत आहेत.

Print Friendly, PDF & Email
Share