साकोली येथील कंत्राटी प्राध्यापकाने जीवन संपवले
भंडारा: साकोली येथील इंग्रजी विषयाच्या कंत्राटी प्राध्यापकाने जीवन संपवले. मिलींद नत्थू घोडीचोर (वय ४०, रा. पंचशील वॉर्ड, साकोली) असे मृत प्राध्यापकाचे नाव आहे. ही घटना आज (दि.१२) सकाळी उघडकीस आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी मिलिंद यांनी घरी गळफास घेऊन जीवन संपवले. मिलिंद यांचे वडील वरच्या माळ्यावर गेले असता त्यांना ते मृतावस्थेत आढळून आले. त्यांनी आरडाओरड करुन शेजाऱ्यांना बोलविले.
मिलिंद घोडीचोर यांचे भाऊ अनिल घोडीचोर यांनी फिर्याद दिली. साकोली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात अमितेश वडेट्टीवार करीत आहेत. मिलिंद घोडीचोर यांच्या पश्चात आई-वडील व चार भाऊ आहेत.