स्वच्छ देवरी , सुंदर देवरीचे स्वप्न भंगणार का ?

चक्क मुख्य प्रवेशद्वारावर तयार झाला कचऱ्याचा डँपिंग यार्ड, नगरपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे चक्क जिप प्राथमिक शाळा , समुह साधन केंद्र, कृषी उत्पन्न बाजार समिती च्या प्रवेशद्वारावर तयार झाला “डम्पिंग यार्ड”, स्वच्छ सर्वेक्षण फक्त नावा पुरतेच ?

देवरी ११: नगरपंचायत देवरी द्वारा स्वच्छ सर्वेक्षण नुकतेच पार पडले असून विविध उपक्रम राबवून जनजागृती करण्यात आली परंतु दुर्लक्षित कारभारामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे . ओला कचरा , सुखा कचरा स्वच्छता विल्हेवाट लावण्यासाठी QR कोड सुद्धा बसविण्यात आले.

सविस्तर असे कि देवरी येथील मधोमध जिप प्राथमिक शाळा , समुह साधन केंद्र, कृषी उत्पन्न बाजार समिती च्या दर्शनी भागात चक्क ‘डम्पिंग यार्ड’ तयार झालेले असून याकडे नगरपंचायत प्रशासनाचे लक्ष का जात नाही? असा सवाल उपस्थित होत आहे .

प्लास्टिक , बाजारातील कचरा, सलून वेस्टेज, घाणेरडा कचरा बाहेर टाकल्यामुळे हवेच्या प्रवाहासोबत सदर वेस्टेज शासकीय कार्यालयासमोर येतो त्यामुळे विद्यार्थी , कर्मचारी , नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही .

Print Friendly, PDF & Email
Share