सौंदड महामार्गावर हॉटेलमध्ये सिलेंडरचा स्फोट

मोठी जिवितहानी टळली : तातडीने पोलीस घटनास्थळी

सौंदड ⬛️ भंडारा गोंदिया जिल्हा सीमेवरील बोपाबोडी फाटा येथील ब्राह्मणकर हॉटेलमध्ये शुक्रवार ( ०८ मार्च ) सायं. ०५:२० दरम्यान अचानक आग लागून तिथे किचनमध्ये ठेवलेल्या सिलेंडरचा स्फोट होऊन मोठी मालमत्तेचे नुकसान झाले. तर दूरपर्यंत आगीचे आगडोंब उसळत होते. तातडीने सौंदड रेल्वे पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत याची सुचना सडक अर्जूनी पोलीसांना दिली आहे.
भंडारा गोंदिया जिल्हा सीमेवरील बोपाबोडी फाटा येथील ब्राह्मणकर हॉटेलमध्ये काल शुक्रवारी सायं. ५ : २० दरम्यान आग लागली. या आगीचे धुरांचे आगडोंब सौंदड पर्यंत जनतेच्या लक्षात येताच याची सुचना पोलीसांना मिळाली. घटनास्थळी धुरांचे लोट निघत असताच एक जोरदार विस्फोट होऊन त्या हॉटेलमधील असलेला सिलेंडर फुटला आणि भयानक आवाज होताच नागरिक घाबरले. तातडीने याची सुचना सडक अर्जूनी पोलीसांना मिळाली. सौंदड पोलीसांनी शासकीय रूग्णालय सडक अर्जूनी वरून त्वरीत रूग्णवाहिकेला पाचारण केले होते. सदर घटनेत वृत्त लिहेपर्यंत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या भयानक आग विस्फोटात मालमत्तेचे नुकसान झाले आहे. सदर आग नेमकी कशामुळे लागली हे कारण पोलीस प्रशासन माहिती घेत आहेत. तब्बल एक तासानंतर या आगीवर नियंत्रण आणले गेले. तेथे उपस्थित सरपंच हर्ष मोदी व ग्रामपंचायत कमेटीने घटनास्थळी धाव घेत याची दखल घेतली आहे.

Print Friendly, PDF & Email
Share