पोलीस पाटील भरती मध्ये मोठा घोळ अपात्र उमेदवारांचा आरोप, चौकशी होत पर्यंत आमरण अपोषण
◼️जोपर्यंत चौकशी होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार आंदोलकाच्या पवित्रा
गोंदिया :- गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पोलीस पाटील भरती करण्यात आली होती, मात्र या पोलीस पाटील भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचा आरोप करून अनेक उमेदवारांनी आंदोलन केली होती. याबाबत उत्तरपत्रिका आणि लेखी गुण याबाबत निष्पक्ष चौकशी व्हावी त्यासाठी आंदोलने करण्यात आले होते. याची दखल उपविभागीय अधिकारी यांनी घेतली होती परंतु आश्वासनाची पूर्तता न झाल्याने अर्जुनी मोरगाव आणि इतर पोलीस पाटील भरतीतील उमेदवारांनी घोळ झाल्याचा आरोप करून सीसीटीव्ही फुटेज लेखी परीक्षेच्या गुणाची तपासणी करण्याबाबत निवेदन देण्यात आलं होतं परत त्यापैकी आश्वासनाची पूर्तता न झाल्यामुळे या सर्व अपात्र पोलीस पाटील भरती चे उमेदवारांनी जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन सुरू केला आहे. या भरतीची निष्पक्षच तपासणी करण्यात यावी असे मागणी केली उमेदवारांनी केली आहे.
पोलीस पाटील भरती मध्ये मात्र उमेदवार आणि पैसे भरून मोठ्या प्रमाणात नियुक्ती करण्यात आल्याचा आरोप अपात्र उमेदवारांनी केला आहे. एवढेच नाहीतर इंटरव्यू च्या वेळेस विशिष्ट रंगाचे कपडे घालण्याचा आरोप केला आहे आणि अनेक अपात्र उमेदवाराच्या परिवाराचे भांडण मारहाण केल्याचा आरोप या उमेदवारांनी करून या सगळ्यांची चौकशी करण्यात यावी आणि दुसरीवर कारवाई करण्यात यावे अशी मागणी आता या उमेदवारांनी केली आहे. आता जिल्हा प्रशासन याकडे कशाप्रकारे बघते हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.
यावेळी आरती आरसुडे (उपोषण करते), योगराज कोरे (उपोषण करते), रूंदना तिरमारे (उपोषण करते) यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या.