आमदार कोरोटे यांनी आमगाव-देवरी विधानसभेतील समस्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात मांडून सरकारचे लक्ष वेधले
देवरी,ता.२९: आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांनी आपल्या विधानसभा क्षेत्रातील विविध समस्या बुधवार (ता.२८ फेब्रुवारी ) रोजी अर्थसंकल्पिय अधिवेशनात मांडून सरकारचे लक्ष वेधले.
आमदार कोरोटे यांनी राज्याच्या शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या सुविधेमध्ये कुवढास प्रकल्प, काशिनाला बांध यांच्या रखडलेल्या बांधकामाविषयी तसेच शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्यासबंधी आणि १२ तास वीज पुरवठा देण्याविषयी तसेच आमगाव नगरपरिषदेच्या निवडणुकी अभावी त्या ठिकाणातील लोकांच्या रखडलेल्या विकासासंबंधी व आमगाव ते सालेकसा रस्त्यावर वागनदी येथे जीर्ण असलेल्या पुलाच्या नवीन बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्याविषयी तसेच अंगणवाडी सेविका, आशावर्कर, पोलीस पाटील, ग्रामपंचायत संगणक परिचालक, शासकिय कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन योजना यांच्या समस्या सोडवण्याविषयी आणि आपल्या क्षेत्रातील बेरोजगार युवकांना देवरी येथील एम.आय.डी.सी. मध्ये उद्योग चालू करून रोजगाराची संधी उपलब्ध करण्यासबंधी सरकारकडे अर्थसंकल्पिय अधिवेशनात आमदार कोरोटे यांनी मागणी केली आहे.