गोंदिया जिल्हा मुख्याध्यापक संघाकडून शिक्षणाधिकारी कादरशेख यांना निरोप

जे कार्य केले ते विद्यार्थ्यांच्या हिताकरिता
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास व शाळेच्या दर्जा उंचावण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबवून सर्व मुख्याध्यापकांना प्रेरणा देणारे सेवा हमी कायद्यानुसार पंधरवाडा कार्यक्रमाच्या माध्यमातून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या वेळेवर सोडविणारे कर्तव्यदक्ष, नियमांची जान असणारे, मराठी भाषेवर प्रभुत्व असणारे, वेळेचे भान पाडणारे अक्षर स्पंदने या काव्यसंग्रहाचे लेखक, मराठी प्रेमी, कर्तव्य तत्पर व उपक्रमशील गोंदिया जिल्हा माध्यमिक शिक्षण विभाग स्तरावर असणारे कादर शेख शिक्षणाधिकारी यांना निरोप देण्यात आला. गोंदिया जिल्हा माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष दुर्गाप्रसाद पटले, उपाध्यक्ष सी.जी. पाऊलझगडे, विदर्भ महिला प्रतिनिधी आदर्श पुरस्कार प्राप्त प्राचार्य रजिया बेग, माजी अध्यक्ष रमेश तनवाणी, प्राचार्य दिनेश बहेकार, देवेंद्र माच्छिरके यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन साहेबाना पुढील वाटचालीच्या भरभरून शुभेच्छा प्रदान केल्या.

Print Friendly, PDF & Email
Share