प्रलंबित प्रकरण निकाली काढण्यासाठी RTI लावा : सीईओ मृगनाथन
सीईओने शिक्षण विभागाला धरले धारेवर
गोंदिया ◾️जिल्हा परिषद गोंदिया येथे आयोजित पेंशन अदालतमध्ये २७ फेब्रुवारीला सन २०१८ पासून प्रलंबित असलेल्या चटोपाध्याय व निवड श्रेणी प्रस्ताव बाबत संघटनेने विचरणा केली असता शिक्षण विभागाने उत्तर देऊ शकले नाही. डिसेंबर २०२३ च्या पेन्शन अदालतीच्या कार्यवृत्तमध्ये २५० लोकांचे प्रकरण तपासले असे उल्लेख केला. परंतु एक ही प्रकरण निकाली काढण्यात आले नाही असे दिसून आले. त्यावर मुख्य कार्यपालन अधिकारी मृगनाथन यांनी शिक्षण विभाग व समान्य प्रशासन यांच्यात ताळमेळ नसल्याचे बोलले व त्यांनी नाराजी व्यक्त केली. म्हणून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आपल्या प्रलंबित प्रकरणासाठी RTI लावा, असा सुर काढला. सभेला मुख्य कार्यपालन अधिकारी मृगनाथन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जी.आर. मकर, शिक्षणाधिकारी डॉ. महेंद्र गजभिये, उपलेखा व वित्त अधिकार निषाड, कक्ष अधिकारी बांगडे, शिक्षण विभागाचे कक्ष अधिकारी सौरभ अग्रवाल, सर्व संवर्गचे एचओडी, तालुक्याचे अधिकारी व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
कोणत्याही परिस्थितित वयोवृद्ध सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वारंवर त्रास होता कामा नये, त्यांचे कोणत्याही प्रकरनाला प्रथम प्राधान्य देऊन निकाली काढण्याचे निर्देश दिले. संगणक वसुली रक्कम, नक्षल भत्ता वसुली रक्कम परत करण्यासाठी निधी पंचायत समितीला पाठविल्याचे सांगितले, तसेच सातव्या वेतन आयोगाची दूसरी, तीसरी व चौथी किस्तची रक्कम, तसेच उपदान, अंशराशीकरण निधी पंचायत समिति ला वर्ग केल्याचे शिक्षण विभागाचे बघेले यांनी सभेत सांगितले. त्याच प्रमाणे तिरोडा येथील सेवानिवृत्त शिक्षक सुधाकर तिडके यांचे सेवापुस्तिका सह प्रस्ताव १० वर्षा पासून प्रलंबित आहे ते निकाली काढणे, पेंशन मंजूरी चे प्रस्ताव त्वरित निकाली काढणे, २००२ ते २०१५ पर्यंत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना नक्षलभत्ता साठी निधी ची मागणी करने, दप्तर दिरंगाई कायदा अमलात आनने, तसेच व्यक्तिगत प्रश्न निकाली काढण्याचे सांगण्यात आले.
सभेत महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व अधिकारी संघटनाचे जिल्हाध्यक्ष एल.यु. खोब्रागडे, पी. आर. पारधी, पी. एन. बडोले, ओमप्रकाश वासनिक, एन.आर. ठाकरे, बोपचे, के. एस. शिवणकर, आनंद पुंजे, डी. जी. बिसेन, भेलावे, बनकर, येरणे, कोरे यांनी सभेत मुद्दा उपस्थित केला.. मुख्य कार्यपालन अधिकारी साहेबानी संघटनेला चांगला प्रतिसाद दिला व प्रकरण निकाली काढण्याचे आश्वासन दिले. सर्व संघटनेच्या वतीने आभार मानले. सभेला सर्व संघटनेचे तालुका अध्यक्ष, सचिव व सेवानिवृत्त बंधू भगिनी उपस्थित होते.