शिक्षकांचा गुणगौरव व यथोचित सत्कार सोहळा साजरा

■ आमची शाळा आदर्श शाळा स्पर्धेमध्ये देवरी तालुक्यातील शाळेचे नाव लौकीक केल्याबद्दल सत्कार सोहळा

देवरी,ता.२८: शैक्षणिक सत्र २०२३-२४ मध्ये जिल्हा परिषद गोंदिया यांच्यामार्फत विविध शैक्षणिक स्पर्धा घेण्यात आले. ककोडी केंद्र हा जिल्ह्याच्या टोकावरील अतिशय दुर्गम क्षेत्र व अतिसंवेदनशील क्षेत्र अशी ओळख असलेल्या परिस्थितीत या केंद्रातील विविध शाळेने संपूर्ण जिल्हामध्ये शिक्षकांनी, विद्यार्थी व गावकरी यांच्या सहकार्याने त्यांचे शाळेचे, केंद्राचे व तालुक्याचे नाव उज्वल केले आहे.
अशा शाळांचा, शिक्षकांचा गुणगौरव व यथोचित सत्कार सोहळा मंगळवार (ता. २७ फेब्रुवारी ) रोजी पार पडला.
सदर कार्यक्रम
समूह साधन केंद्र ककोडी आणि जि.प.सदस्य उषाताई शहारे यांच्या द्वारे जिल्हा परिषद प्राथ.शाळा उचेपूर या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता.
जिल्हा परिषद गोंदिया आणि अदानी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आमची शाळा आदर्श शाळा या स्पर्धेमध्ये देवरी तालुक्यात प्रथम व जिल्ह्यामध्ये तृतीय क्रमांक प्राप्त जिल्हा परिषद प्राथ शाळा उचेपूर शाळेचे शिक्षक दिलीप शिवणकर सर व शिक्षिका प्रियंका रामटेके (वाहने) मॅडम आणि याच स्पर्धेमध्ये देवरी तालुक्यात द्वितीय क्रमांक प्राप्त जि. प. प्राथ. शाळा येडमागोंदी शाळेचे शिक्षक
प्रशांत बडोले सर यांचा शाल आणि श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद व प्राथ शाळा मेहताखेडा या शाळेचे देवरी तालुक्यामध्ये द्वितीय क्रमांक आल्याबद्दल शाळेचे शिक्षक विरेंद्र खोटेले, चंद्रकांत लांजेवार, वर्षा बडवाईक मॅडम व प्रिन्स गजभिये सर तसेच
नेतृत्व कौशल्याने – उत्कृष्ट प्रशासन, सामंजस्य भूमिका, सहकार्य वृत्तीने ककोडी केंद्राचे नावलौकिक केल्याबद्दल ककोडी केन्द्राचे केन्द्र प्रमुख एस.जी.राऊत सर
या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.सदस्य उषाताई शहारे हे होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून पं. स.सदस्य भारतीताई सलामे,
देवरीचे गटशिक्षणाधिकारी महेंद्रजी मोटघरे, उचेपूरच्या सरपंच शेवंताबाई गहाने,श्रीभरणे सर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यशकुमार बडोले,तंटा मुक्ती समितीचे अध्यक्ष दिलीप बडोले,गावकरी मंडळी व केंद्रातील सर्व शिक्षक यांच्यासह सर्व शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.
या वेळी उषाताई शहारे यांनी शाळेला शुभेच्छा दिल्या आणि शाळेचे, गावाचे, शिक्षकांचे अभिनंदन केले.तर
तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री मोटघरे साहेब यांनी शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता ही वाखाणण्याजोगी आहे,असे मत व्यक्त केले.आणि एस.जी.राऊत सर यांनी ककोडी केंद्रातील सर्व शिक्षक शिक्षिका यांचे सहकार्याचे आभार मानले.दिलीप शिवणकर सर यांनी शाळेला जे क्रमांक मिळाले आहे त्याचे श्रेय विद्यार्थांना, पालकांना दिले. व गावातील सर्व नागरिक, केंद्रातील सर्व शिक्षक यांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी संचालक राजेश रामटेके , सुजित बोरकर, शैलेश बागडे,अतुल गणवीर, आशिष रंगारी, कुंदन ठेंगाहे सर, दिपक लांजेवार,श्रीमार्गाये सर, श्रीचौरागडे सर, नितीन कुंभरे,मनीष नागभिरे, कृष्णा बावनकर, रोशन कराडे, श्रीघुगे सर,श्रीसोनकुकरा सर, किशोर नेताम,जितेंद्र कानतोडे आदिंनी सहकार्य केले.

Print Friendly, PDF & Email
Share