सी. एस. इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे अणुविद्युत अभियांत्रिकी विभागातर्फे “मराठी राजभाषा गौरव दिन” साजरा

देवरी:- स्थानिक सी. एस. इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे अणुविद्युत अभियांत्रिकी विभागातर्फे कवी कुसुमाग्रज यांची जयंती “मराठी राजभाषा गौरव दिन” साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री. ए. एम. खतवार सर, प्राचार्य तसेच प्रमुख अतिथी श्री. आर. एल. मेश्राम सर, एकेडमिक इन्चार्ज व श्री. एम. एम. तरोणे सर, विभाग प्रमुख अणुविद्युत अभियांत्रिकी हे होते.
यावेळी प्रथमतः माँ शारदा व कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पन करण्यात आले. त्यानंतर या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व अध्यक्ष यांनी आपल्या भाषणातून मराठी भाषेची महती विद्यार्थ्यांना पटवून दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. एम. एम. तरोणे सर यांनी केले तर संचालन कु. एस. एल. सोनेवाने मैडम तसेच आभार प्रदर्शन कु. आर. के. राऊत मैडम यांनी केले. मराठी राजभाषा गौरव दिनाच्या या कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share